गौतम अदानींवर अमेरिकेत लावला होता हा आरोप, जाणून घ्या 265 दशलक्ष डॉलर्सबाबत काय होता दावा

गौतम अदानी यांच्यावर 265 दशलक्ष डॉलर्स किंवा सुमारे 2236 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आणि अमेरिकेतील त्यांच्या कंपनीचे कंत्राट मिळवण्यासाठी ते लपविल्याचा आरोप आहे.

गौतम अदानी अमेरिकेत आरोपीगौतम अदानी अमेरिकेत आरोपी
marathi.aajtak.in
  • नई दिल्ली,
  • 21 Nov 2024,
  • अपडेटेड 7:58 AM IST

भारतीय अब्जाधीश आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्या कंपनीच्या गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा हा आरोप आहे. अमेरिकेतील आपल्या कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी 265 दशलक्ष डॉलर्स किंवा सुमारे 2236 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आणि तो लपवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हे संपूर्ण प्रकरण अदानी ग्रुपची कंपनी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि अन्य एका फर्मशी संबंधित आहे.

अदानींवर कोणते आरोप झाले?
अमेरिकेतील सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने (एसईसी) बुधवारी या प्रकरणी गौतम अदानी यांचा पुतण्या सागर अदानी, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे अधिकारी आणि ॲझूर पॉवर ग्लोबल लिमिटेडचे कार्यकारी अधिकारी सिरिल कॅबनेस यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
आरोपही केले आहेत. अहवालात म्हटले आहे की, गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर यांनी इतर सात प्रतिवादींसह त्यांच्या अक्षय ऊर्जा कंपनीसाठी कंत्राट मिळवण्यासाठी आणि भारतातील सर्वात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा विकास करण्यासाठी सुमारे $265 दशलक्ष लाच देण्याचे मान्य केले होते.