गेल्या बुधवारी गोव्यात एका कुत्र्याला दुचाकीला बांधून अनेक किलोमीटरपर्यंत ओढून नेल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी आता पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. अशोक पन्हाळकर म्हापसा येथील खोर्लीम येथे राहत असून ते मूळ कर्नाटकातील बेळगाव येथील असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. त्याच्याविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: Video: 5 व्या मजल्यावरून 3 वर्षाच्या मुलीवर कुत्रा पडला, निष्पापाचा जीव गेला
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता
या अधिकाऱ्याने सांगितले की, पन्हाळकर यांच्या कथित क्रूर कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. व्हायरल झालेल्या व्हिडिओवर लोकांनी प्रश्न उपस्थित केले होते. याशिवाय आरोपी तरुणावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून त्याचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा : कुत्रा पडला पाण्यात, अनेकांनी जीव धोक्यात घालून वाचवला, पाहा VIDEO
ओढल्यानं कुत्र्याचा मृत्यू झाला
अधिकाऱ्याने सांगितले की, 4 सप्टेंबर रोजी दुपारी पन्हाळकर यांनी कुत्र्याला त्याच्या मोटरसायकलला बांधले होते. यानंतर त्याला मारहाण करून लांबवर ओढत नेले. ओढल्याने कुत्रा जखमी झाला. त्यामुळे कुत्र्याचा मृत्यू झाला. यानंतर मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला. या घटनेचा कोणीतरी व्हिडिओ बनवून व्हायरल केला होता. त्यानंतर पोलीस आरोपी तरुणाचा शोध घेत होते. कुत्र्याला दुचाकीला बांधून ओढण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही कर्नाटकात एका व्यक्तीने कुत्र्याला दुचाकीला बांधून ओढले होते, त्यामुळे कुत्र्याचा मृत्यू झाला होता.