दिल्लीच्या खासगी शाळेला बॉम्बची धमकी, एफआयआर नोंदवून तपास सुरू

हा ईमेल दुपारी 12.30 वाजता पाठवण्यात आला. मात्र शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता शाळा प्रशासनाने इमेल पाहिल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शाळा रिकामी करून तपास सुरू केला.

प्रातिनिधिक चित्रप्रातिनिधिक चित्र
हिमांशु मिश्रा
  • नई दिल्ली,
  • 02 Aug 2024,
  • अपडेटेड 10:58 AM IST

दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलास येथील समरफिल्ड स्कूलला धमकीचा मेल आला आहे. या मेलमध्ये शाळेत बॉम्ब ठेवण्याची धमकी देण्यात आली आहे.
हा ईमेल दुपारी 12.30 वाजता पाठवण्यात आला. मात्र शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता शाळा प्रशासनाने इमेल पाहिल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शाळा रिकामी करून तपास सुरू केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेत बॉम्ब ठेवण्याची ही धमकी फसवी असल्याचे समजते. याप्रकरणी एफआयआर दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.