छत्तीसगडमधील बालोदाबाजार जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अहवालानुसार, कुटुंबातील 2 बहिणी, 1 भाऊ आणि 1 मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली.
हत्येची ही खळबळजनक घटना कासडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छरछेड गावात घडली. या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात जादूटोणा आणि अंधश्रद्धेतून ही हत्या करण्यात आल्याचे दिसते.
याप्रकरणी पोलिसांनी ३ आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून कासडोल पोलीस घटनास्थळी हजर आहेत. चैत्राम, जमुनाबाई केवट, जमुनाबाईची लहान मुलगी आणि यशोदाबाई केवट अशी मृतांची नावे आहेत.