नेपाळमध्ये भीषण अपघात, दोन भारतीय नागरिक ठार, दोन जखमी

नेपाळमधील संखुवासभा जिल्ह्यात बुधवारी झालेल्या ट्रक अपघातात दोन भारतीयांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन भारतीय नागरिकही जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नेपाळमध्ये मोठी दुर्घटनानेपाळमध्ये मोठी दुर्घटना
marathi.aajtak.in
  • नई दिल्ली,
  • 31 Oct 2024,
  • अपडेटेड 3:56 PM IST

नेपाळमधून एका मोठ्या अपघाताची बातमी समोर आली आहे. बुधवारी एका ट्रकचा भीषण अपघात झाला ज्यामध्ये दोन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. संखुवासभा जिल्ह्यातील फयकसिंदा दोभान परिसरात हा अपघात झाला.

57 वर्षीय ट्रक चालक शैलेंद्र प्रताप सिंग आणि 29 वर्षीय मदतनीस शाहरुख मोहम्मद अशी दोन्ही मृतांची नावे आहेत. हे दोघेही नेपाळमधील एका जलविद्युत प्रकल्पात काम करत होते. अपघातात जखमी झालेले दोघेही भारतीय वंशाचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मकालू ग्रामीण नगरपालिका परिसरात घडली. डीएसपी दक्ष कुमार बस्नेत यांनी सांगितले की, 'एचपी 11-4933' क्रमांकाच्या टिप्पर ट्रकचा बुधवारी रात्री मकालू ग्रामीण नगरपालिका-5 परिसरात अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.

डीएसपी दक्ष कुमार यांनी सांगितले की, दोन्ही जखमींना तातडीने जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

नुकताच नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यातील ऐना पहाडा येथे बसचा भीषण अपघात झाला. जिथे एक भारतीय पर्यटक बस महामार्गापासून 150 मीटर खाली मर्स्यांगडी नदीत पडली. या अपघातात 27 जणांचा मृत्यू झाला, तर उर्वरितांना वाचवण्यात यश आले. बसमध्ये चालक आणि कंडक्टरसह 43 जण होते. पर्यटक बस पोखराच्या रिसॉर्टमधून काठमांडूच्या दिशेने जात होती.